Thursday, October 30, 2025
Happy Diwali

मनसेचे देशपांडे, धुरींना अटकपूर्व जामीन मंजूर

मनसेचे देशपांडे, धुरींना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अखेर दिलासा मिळाला आहे. या दोन्ही नेत्यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना काही अटीही घातल्या आहेत.

‘संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला असून त्यांना २३ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात उपस्थित राहून पोलिसांच्या तपासाला सहकार्य करावे लागणार आहे. तसेच या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आणि १६ तारखेला त्यांना पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावं लागेल,’ अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.

तसेच देशपांडे आणि धुरी यांनी तपासाला सहकार्य न केल्यास त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी पोलीस न्यायालयात जाऊ शकतात, असेही घरत म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा