Wednesday, April 23, 2025
Homeमहत्वाची बातमीमोबाईलमधील रेडिएशनमुळे होतो मेंदूवर वाईट परिणाम

मोबाईलमधील रेडिएशनमुळे होतो मेंदूवर वाईट परिणाम

मुंबई (प्रतिनिधी) : मोबाईल फोन आणि वायफाय रेडिएशनच्या अतिवापरामुळे अल्झायमर होऊ शकतो. ‘करंट अल्झायमर रिसर्च’ या जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते सेल फोन रेडिएशनमुळे मेंदूच्या पेशींमध्ये कॅल्शियमची पातळी वाढते. ते अल्झायमरचे मुख्य कारण आहे.

फोनच्या वापरामुळे ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स’ निर्माण होतो. त्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. या संशोधनात शास्त्रज्ञांनी अल्झायमरशी संबंधित अनेक अभ्यासांचा आढावा घेतला. त्यांना आढळले की फोनचा वापर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स तयार करतो. त्यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. संशोधकांचा विश्वास आहे की वायरलेस कम्युनिकेशन सिग्नल्स, विशेषत: मेंदूतले ‘व्होल्टेज गेट कॅल्शियम चॅनेल’ सक्रिय करतात. त्यामुळे कॅल्शियमचे सेवन वाढते. मेंदूतल्या कॅल्शियमचे प्रमाण अचानक वाढल्यावर अल्झायमरची अवस्थाही लवकर येते. प्राण्यांच्या संशोधनात समोर आले आहे की ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स’ मुळे पेशींमध्ये कॅल्शियम जमा झाल्यामुळे अल्झायमर अकाली जडू शकतो. अल्झायमर जडण्याचे सरासरी वय कमी झाले आहे. अल्झायमरच्या रुग्णांचे सरासरी आयुर्मानदेखील गेल्या २० वर्षांमध्ये कमी झाले आहे.

अलीकडील अभ्यासानुसार, ३० ते ४० वर्षं वयोगटातले तरुणदेखील या आजाराला बळी पडत आहेत. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, अल्झायमरशी संबंधित बदल लक्षणे दिसण्यापूर्वी २५ वर्षं आधीच लोकांमध्ये दिसू लागतात. ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स’ च्या संपर्कात आल्याने वृद्धापकाळाच्या आधी अल्झायमर जडू शकतो. जगभरातल्या वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या वाढत्या ट्रेंडमुळे हे घडले आहे. तासन्तास मोबाईल आणि वायफाय रेडिएशनच्या संपर्कात राहिल्याने हे घडत आहे. त्याला ‘डिजिटल डिमेंशिया’ असे म्हणतात. जगातले ४४ दशलक्ष लोक अल्झायमरसह काही प्रकारच्या स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत.

अल्झायमरला महामारी बनण्यापासून रोखण्यासाठी तीन विषयांवर संशोधन करावे लागेल, असे संशोधनात म्हटले आहे. एमआरआय स्कॅनद्वारे तरुणांमध्ये डिजिटल डिमेंशियाची असामान्य लक्षणे, ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये अल्झायमरची प्रारंभिक चिन्हे आणि किमान एक वर्ष मोबाइल अँटेनाजवळ राहणाऱ्या लोकांच्या मनावर त्याचा परिणाम यावर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. यापैकी सुमारे ५३ लाख लोक ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, तर दोन लाख लोक तरुण आहेत आणि अल्झायमरच्या सुरुवातीच्या लक्षणांनी ग्रस्त आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -