Saturday, September 21, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत २ दिवसांत मान्सूनपूर्व पावसाचा इशारा

मुंबईत २ दिवसांत मान्सूनपूर्व पावसाचा इशारा

मुंबई : यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सोमवारी मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला आहे. यामुळे केरळमध्ये मान्सून चार दिवस तर मुंबईत ३ दिवस आधीच मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पण यासोबतच शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये प्री-मान्सूनची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे २० ते २१ मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेळेआधीच मान्सून सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे पालिकेसमोर साफसफाईचे मोठे आव्हान आहे. मान्सूनपूर्व नाल्याची सफाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. बीएमसीने नाले सफाईसाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली आहे. आतापर्यंत नाल्याच्या साफसफाईचे अनेक काम बाकी आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मान्सूनपूर्व पाऊस झाल्यास नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

दिनेश मिश्रा म्हणाले की, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास चांगला झाला. त्यामुळे केरळसह मुंबईत मान्सून वेळेआधी दाखल होईल. दुसरीकडे, केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -