Wednesday, April 23, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेचोरीच्या हव्यासापोटी चोरटा आठव्या मजल्यावरून पडून ठार

चोरीच्या हव्यासापोटी चोरटा आठव्या मजल्यावरून पडून ठार

डोंबिवली (वार्ताहर) : रिकाम्या इमारतीत रात्रीच्यावेळी चोरी करायची आणि दिवसा भंगार विक्री करायची, असा त्याचा दुहेरी कार्यक्रम होता. सोमवारी चोरी करताना इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पाईपच्या आधारे खाली उतरताना पडून चोरटा जागीच ठार झाला. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील बीएसयूपीच्या रिकाम्या इमारतीत घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद सलील भाटकर (२४, रा. न्यू गोविंदवाडी केडीएमसी वसाहत, कचोरे कल्याण) असे चोरी करताना ठार झालेल्या चोरट्याचे नाव आहे. तर अल्फात मुस्तफा पिंजारी (२२ रा. कचोरे गाव न्यू गोविंदवाडी) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. हे दोघे चोरटे सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील बीएसयूपी प्रकल्पातील रिकाम्या इमारतीत चोरी करण्याच्या इराद्याने घुसले.

इमारतीच्या आठव्या मजल्यावर गेल्यावर हे दोघे चोरटे खिडक्या आणि इतर भंगार सामान जमा करत होते. इतक्यात इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा आवाज आल्याने ते इमारतीत गेले. चोरट्यांचा आवाज आल्यावर सुरक्षा रक्षकाने अंधारात बॅटरी चालू करून इमारतीत कोण आहे ते पाहत होते. इतक्यात आपण पकडले जाऊ या भीतीने मोहम्मद बिनदास्त खिडकीच्या बाहेरील पाईपवरून उतरून पळण्याचा प्रयत्न केला. अल्फातने मजल्यावरून उतरून पळ काढला. काही वेळाने अल्ताफ पुन्हा इमारतीच्या आवारात आल्यावर त्याला आपला मित्र दिसला नाही. रस्त्यावरून चालत असताना अंगावर शर्ट नसल्याने काही नागरिकांनी त्याची विचारणा केली.

त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र आता पकडले जाऊ या भीतीने त्याने नागरिकांना सर्व खरे सांगितले. नागरिकांनी यांची माहिती रात्री अडीच वाजता टिळकनगर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी आल्यावर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबवर दुसरा चोरटा पडलेला दिसला. त्याच्या हातापायाला चुना लागल्याचे पाहून त्याने पाईपवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना पडून ठार झाल्याचे दिसले.

मोहम्मदच्या डोक्याला मारा लागून त्याच्या कानातून रक्त येत होते. घटनास्थळी पोहोचण्याच्या दोन तासाअगोदर मोहम्मदचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोहम्मदचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला. तर या घटनेतील दुसरा चोरटा अल्फात हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अल्फातवर पोलिसांनी चोरीच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -