मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर हा चित्रपट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच पाहिला. पण चित्रपटाचा शेवट पाहणे त्यांनी टाळले. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. ‘दुःखद शेवट पाहू शकणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले? असं समजू नका.
चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री राणे साहेबांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी शेवट पाहिला नाही. यावरून हे देखील कळते की, शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरे हे नव्हते. सत्य नेहमीच बोचरे असते’, असे ट्वीट नितेश राणे यांनी शेअर केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले. याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते. ते म्हणाले, ‘मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पाहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता,’ असे मुख्यमंत्री म्हणाले होते. प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…