Thursday, July 10, 2025

राजीव गांधींचा मारेकरी एजी पेरारिवलन ३१ वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार, सर्वोच्च न्यायालयाचे सुटकेचे आदेश

राजीव गांधींचा मारेकरी एजी पेरारिवलन ३१ वर्षानंतर तुरुंगाबाहेर येणार, सर्वोच्च न्यायालयाचे सुटकेचे आदेश

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी जी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी दिले. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी पेरारिवलन याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.


पेरारिवलन ३० वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत स्पष्टपणे म्हटले होते की, जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर आम्ही त्याची सुटका करू. त्याच प्रमाणे आज न्यायालयाने पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश दिले.


न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील अन्य आरोपी निलिनी श्रीहरन, मरुगन आणि श्रीलंकन नागरिकासह अन्य ६ आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणात ७ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा जन्मठेपेत बदलली.

Comments
Add Comment