Friday, May 9, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

मुंबईतील प्रभाग रचनेवरून नाना पटोलेंचे आता शिवसेनेला आव्हान!

मुंबईतील प्रभाग रचनेवरून नाना पटोलेंचे आता शिवसेनेला आव्हान!

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जुन्या २२७ सदस्यांच्या संख्येत नऊने वाढ केली आहे. आता २३६ सदस्य संख्या आणि प्रभाग सीमारेषांची अंतिम अधिसूचनाही निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. पण नव्या रचनेत जवळपास १२ त १५ जागा अशा आहेत, जिथे काँग्रेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस नाराज आहे.


गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजला साथ दिल्याने काँग्रेस एकाकी पडली. राष्ट्रवादीने फक्त गोंदियातच नवे तर यापूर्वीही भाजपला साथ दिल्याने काँग्रेस नाराज आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार थेट काँग्रेस हायकमांडकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता नाना पटोले यांनी प्रभाग रचनेवरून शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.


पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदा होईल, अशा पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली आहे. तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचा फायदा होईल, अशा प्रकारची प्रभाग रचना केल्याचा आरोप होत आहे. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. यामुळे या प्रभाग रचनेवरून काँग्रेस नाराज आहे. प्रभाग रचनेवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. आणि आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.


निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या प्रभाग रचना करण्यात येत आहेत. या प्रभाग रचनेवरून काँग्रेस नाराज आहे. ज्या पद्धतीने प्रभाग रचना होत, ती योग्य नाही. विशेष करून आमची मागणी दोन जागांच्या प्रभागांची होती. पण तिथे तीनचा प्रभाग करण्यात आला. अनेक ठिकाणी म्हणजे मुंबई आणि पुण्यात आपल्या सोयीनुसार महाविकास आघाडीतील काही पक्षांनी प्रभागांची रचना केली आहे. यामुळे याविरोधात आम्ही निश्चितपणे कोर्टात जाऊ आणि न्याय मिळवण्याची आमची भूमिका आहे, असं नाना पटोले म्हणाले.


राज्यात महाविका आघाडी सरकार आहे. सत्तेतील सर्वक्षांनी मिळून निवडणुकीसाठी वॉर्ड रचना केली पाहिजे. आपण सोबत राहून आपल्या मित्र पक्षाचच नुकसान होत असेल तर ते योग्य नाही. यामुळे त्या-त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे, असं नाना पटोले म्हणाले. ज्या पद्धतीने प्रभाग रचना केली आहे, त्याविरोधात आम्ही पुण्यासह इतर ठिकाणी न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.


मुंबईतील प्रभाग रचनेवरून नाराज असलेल्या काँग्रेसने आता मुंबई महापालिकेच्या नालेसाफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी काँग्रेसने कोर्टात धाव घेतली आहे. यावरूनही नाना पटोले यांनी भूमिका मांडली आहे. भ्रष्टाचार हा नंतर भाग आहे. पण दरवर्षी पावसामध्ये मुंबई पाण्याखाली येते. मुंबईत अनेक वर्षे काँग्रेसचा महापौर राहिलेला आहे. काँग्रेसच्या काळात कधीच मुंबईत डुबली नाही. पण अलिकडच्या काळात सातत्याने मुंबई पाण्याखाली येते. यामुळे मुंबईच्या जनतेसाठी काँग्रेस कोर्टात गेली आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Comments
Add Comment