Thursday, July 3, 2025

काशीनंतर आता मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद

काशीनंतर आता मथुरेत श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद

मथुरा (प्रतिनिधी) : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर आता मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचे प्रकरण जोर धरू लागले आहे. याच प्रकरणी मंगळवारी फिर्यादीचे वकील केशव कटरा यांनी शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणासाठी पुन्हा एकदा जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल केला.


हा अर्ज न्यायालयाने मान्य केला असून, या अर्जावर पुढील सुनावणी १ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे. मथुरेच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात या याचिकेवर मंगळवारी झाली.


यावेळी वादीतर्फे वकील महेंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले की, हिंदूंना पूज्य असलेल्या शेषनागाची आकृती या स्तंभावर कोरलेली आहे. शाही ईदगाह मशीद ते दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तो परिसर सील करण्यात यावा. तसेच शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण कोर्ट कमिशनर नेमून करण्यात यावे.

Comments
Add Comment