Thursday, January 15, 2026

महाराष्ट्रातील सर्वात मोठे आधार केंद्र ठाण्यात

ठाणे (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वाधिक मोठे आधारकार्ड केंद्र हे ठाण्यात उभारण्यात आले असून या आधारकार्ड केंद्रात अवघ्या १० मिनिटात आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ठाण्याच्या लेकसिटी मॉलमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात दररोज ३०० पेक्षा अधिक नागरिक या केंद्राचा लाभ घेत आहेत.

केंद्र शासनाने आधारकार्ड या योजनेला विशेष महत्व दिले आहे. त्यानुसार भारतात ७६, तर महराष्ट्रात नागपूर, अमरावती, पुणे, धुळे आणि ठाणे आदी आठ ठिकाणी हे केंद्र उभारण्यात आले आहे.

या ठिकाणी आधारकार्ड काढण्याची पद्धत सोपी व सुटसुटीत असून यासाठी अवघ्या १० मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण होते. या ठिकाणी प्रतिदिन एक हजार आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया राबविण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिली आहे.

दर पाच वर्षांनी आपले आधारकार्ड नूतनीकरण करावे लागणार असल्याचे सांगत, जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले.

Comments
Add Comment