Sunday, October 19, 2025
Happy Diwali

राज्यातील आदर्श शाळांचा चेहरामोहरा बदलणार

राज्यातील आदर्श शाळांचा चेहरामोहरा बदलणार

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ४८८ शाळांच्या विकासासाठी राज्य शिक्षण विभागाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आले असून आदर्श शाळा म्हणून या शाळांना बांधकाम तसेच नूतनीकरणासाठी संबधित निधी देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांना नव संजीवनी मिळणार असून शाळांचे चेहरामोहरा बदलणार आहे.

चांगली शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देणाऱ्या शाळांची निवड करण्यात येते आणि त्यानुसार त्यांना अत्याधुनिक करण्यासाठी निधी पुरविण्यात येतो. त्यानुसार यंदा ४८८ शाळांची निवड करण्यात आली आहे. संबधित निधी शिक्षण आयुक्त, समग्र शिक्षा अभियान, यांच्यावतीने मंजूर करण्यात येतो.

यामध्ये पालघरमधील ५ शाळा, रायगड मधील १५, रत्नागिरी १०, सिंधुदुर्ग १० आणि ठाणे ग्रामीण भागातील ५ शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. या शाळांना शिक्षण विभागाकडून नवीन बांधकाम, नूतनीकरण यासाठी मोठा निधी देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >