पालघर (प्रतिनिधी) : समग्र शिक्षा जिल्हा परिषद पालघर अंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरीता मोफत पाठयपुस्तक योजने अंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी च्या सर्व माध्यमाची पाठयपुस्तके व लार्ज प्रिंट पुस्तके यांच्या पुरवठयास आजपासून संगीत भागवत मॅडम शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) जि. प. पालघर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सूरुवात करण्यात आली.
तसेच सदर प्रसंगी रुपेश पवार, जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा जि.प.पालघर व विश्वास.पावडे विस्तार अधिकारी तथा गटसमन्वयक, पंचायत समिती पालघर, स्नेहा संखे, राजेश पिंपळे, साधन व्यक्ती तसेच रामकृष्ण गोसावी समावेशित साधन व्यक्ती व दत्तात्रेय कोंडेकर विशेष शिक्षक आदी कर्मचारी उपस्थित होते.
सदर पुस्तके महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद यांच्यामार्फत पुरविण्यात येत आहेत. सदर पाठयपुस्तकांचा पुरवठा महाराष्ट्र राज्य पाठयपूस्तक भांडार,पनवेल बूक डेपो यांच्याकडून करण्यात येत आहे.
सदर मोफत पाठयपुस्तकांचा लाभ हा स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानीत, अंशत: अनुदानीत शाळेत इ.१ ली ते ८ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सूरु होण्याच्या पहिल्या दिवशी एकूण २७०७४३ विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे.