Tuesday, July 16, 2024
Homeमहाराष्ट्रएमएनजीएल कंपनीला साडेबारा लाखांचा दंड

एमएनजीएल कंपनीला साडेबारा लाखांचा दंड

नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. या कंपनीने (एमएनजीएल) शहरात गॅस पाइप लाइनसाठी खोदकाम केल्यामुळे पेठ रोड येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड सिग्रलजवळील जलवाहिनी फुटल्यामुळे गेल्या ३० एप्रिल रोजी संपूर्ण पंचवटी विभागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामुळे महापालिकेने कंपनीला साडेबारा लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.

एमएनजीएलकडून शहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेताच खोदकाम होत असल्याने जलवाहिन्या फुटून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या अनेक घटना घडल्यामुळे मनपा प्रशासनाने कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. जुने नाशिक भागात एका जलकुंभाचे काम सुरू आहे. त्यातून गळती होते की, नाही हे तपासण्यासाठी ठेकेदाराने चक्क चार इंची अनधिकृत जलवाहिनी जोडली आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात येते.

जुने नाशिक भागात स्मार्ट सिटीच्या कामामुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्या खंडित होत असल्याने गावठाणमधील बुधवार पेठ, तिबंधा, भद्रकाली, दूधबाजार, मेनरोड यासह विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे.

नागरिकांना मनस्ताप

एमएनजीएलने पाइपलाइनसाठी २०५ किमी रस्ते खोदकामाची परवानगी घेतली. त्यापैकी ८० किमी रस्ते खोदले असून, रस्ते फोडण्यासाठी ७८ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा केले आहेत. रस्ते खोदताना सव्वा मीटर रुंद व सव्वा मीटर खोलीची मर्यादा डावलली गेल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे असताना प्रशासकीय राजवटीतही मनपा बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत आहे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -