Sunday, August 24, 2025

दापोली पोलीस ठाण्यात लागलेल्या आगीत अनिल परबांविरोधातील कागदपत्र जळाली?

दापोली पोलीस ठाण्यात लागलेल्या आगीत अनिल परबांविरोधातील कागदपत्र जळाली?

मुंबई : दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पोलीस ठाण्याला आग लागली. यामध्ये पोलीस ठाण्याच्या काही भागातील कागदपत्र जळल्याचे समोर आले आहे. पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीत अनिल परबांविरोधातील कागदपत्र जळाल्याची भीती सोमय्यांनी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1526468861477801990

ही आग लावण्यात आल्याचा संशय काहींनी व्यक्त केला आहे. अनिल परब यांच्या मालकीचे अनधिकृत रिसॉर्ट असल्याची तक्रार किरीट सोमय्यांनी याच पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यामुळे अनिल परबांविरोधातील कागदपत्र सुरक्षित आहेत का, याची माहिती मिळावी अशी मुख्य तक्रारदार म्हणून सोमय्या यांनी माहिती मागितली आहे.

Comments
Add Comment