Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मुंबई बॉम्बस्फोटातील ४ आरोपींना अटक

मुंबई बॉम्बस्फोटातील ४ आरोपींना अटक

गांधीनगर, (हिं.स.) : मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी गुजरात एटीएसने चौघांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी चार आरोपींची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुजरात पोलिसांनी अलीकडेच राजस्थानमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याप्रकरणी अकिफ नाचन नावाच्या व्यक्तीलाही अटक केली आहे. यापूर्वी या मॉड्यूलशी संबंधित सात जणांना अटक करण्यात आली होती.

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) राजस्थान पोलिसांकडून या प्रकरणाचा ताबा घेतला आहे. दहशतवादी मॉड्यूलमधील आरोपींवर बेकायदेशीर कृती प्रतिबंध कायदा (युएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment