मुंबई (हिं.स.) : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुशांत शेलार याच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना रविवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास घडली. सुशांत शेलारच्या राहत्या घराबाहेर ही घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी सुशांतने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
रात्री अज्ञात व्यक्तीने येऊन सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक आणि गाडीची तोडफोड केली. यात कारची समोरील काच पूर्णपणे फुटली आहे. याशिवाय या अज्ञात व्यक्तीने कारच्या समोर येऊन बेरिकेट्सही लावले आहे.
हा भ्याड हल्ला असून या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची प्रतिक्रिया सुशांत शेलारने दिली.