Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

पंतप्रधानांची मायादेवी मंदिराला भेट

पंतप्रधानांची मायादेवी मंदिराला भेट

लुंबिनी : नेपाळ, लुंबिनीच्या एक दिवसाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येथील मायादेवी मंदिराला सर्वप्रथम भेट दिली. पंतप्रधानांसोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांच्या पत्नी डॉ.आरझू राणा देउबा उपस्थित होते.मंदिराच्या आवारातील मार्कर स्टोन येथे उभय नेत्यांनी आदरांजली वाहिली, हे भगवान बुद्धांचे जन्मस्थान आहे. बौद्ध धार्मिक विधींनुसार संपन्न पूजेला ते उपस्थित होते.


दोन्ही पंतप्रधानांनी मंदिराशेजारी असलेल्या अशोक स्तंभाजवळ दीपप्रज्वलन केले. इ.स.पूर्व 249 मध्ये सम्राट अशोक यांनी उभारलेला हा स्तंभ लुंबिनी हे भगवान बुद्धांचे जन्मस्थान असल्याचा पहिला अभिलेखीय पुरावा मानला जातो. त्यानंतर, दोन्ही पंतप्रधानांनी बोधी वृक्षाला पाणी घातले. हे रोप बोध गया इथून आणण्यात आले होते आणि पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये भेट म्हणून ते दिले होते. मंदिराच्या अभ्यागत पुस्तिकेत उभय नेत्यांनी स्वाक्षरीही केली.

Comments
Add Comment