मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची सोमवारी, १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता, नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद होणार आहे.
राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारच्या ‘कारभारा’मुळे निर्माण झालेली सध्याची चिंतनीय अशी राजकीय, सामाजिक आणि अन्य क्षेत्रांतील स्थिती यावर केंद्रीय मंत्री राणे काय भाष्य करणार? कोणाकोणावर ‘प्रहार’ करणार? याकडे राजकीय क्षेत्राबरोबरच सर्वांचेच लक्ष लागले आहे.