Monday, September 15, 2025

काशी विश्वेश्वर स्वामी

विलास खानोलकर

अक्कलकोटात एके दिवशी एक बाई दुसऱ्या बाईस म्हणते, “अगं काशी विश्वेश्वराला येतेस का?’’ तेव्हा त्या दुसऱ्या बाईने उत्तर दिले, “काशीला कशाला येऊ? श्री स्वामी समर्थ महाराज हे काशी विश्वेश्वरच येथे अक्कलकोटात आहेत बरे!’’ हा त्या दोघींचा संवाद ऐकून श्री स्वामी समर्थ खदा-खदा हसू लागले आणि दुसऱ्या बाईस म्हणाले, तुला इतके ज्ञान असते, तर भाकऱ्या का बडविल्या असल्यास? पण तुझी खरी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. असे म्हणून स्वामींनी त्या परम स्त्रीभक्तास काशी विश्वेश्वराचे दर्शन खरोखरच दिले व ती स्त्रीभक्त आयुष्याचे कल्याण झाले म्हणून स्वामींना पुन्हा एकदा शरण गेली व स्वामींचा जयजयकार करू लागली.

स्वामी तुम्हीच हो समर्थ असमर्थांना केलेत समर्थ ।।१।। अनेकाच्या आयुष्यात आणला अर्थ भक्तांचा कमी झाला स्वार्थ ।।२।। काम करू लागले नि:स्वार्थ भक्तांना प्राप्त झाला परमार्थ ।।३।। अर्जुनाला वाचविले पार्थ अभिमन्यूला शिकविले पार्थ ।।४।। अनेकांना दाखविले मार्ग बहुतांना मिळाला सन्मार्ग ।।५।। परावृत्त केले वाममार्ग अनेकांना दाखविला स्वर्ग ।।६।। दुष्मनाला दाविला नर्क भक्ताला औषधी अर्क ।।७।। निपुत्रिका दिले पुत्र सुखी संसाराचे दिले सुत्र ।।८।। अंधाला दिली दृष्टी दाखविली िहरवी सृष्टी ।।९।। दुष्काळात केली पर्जन्यवृष्टी सद्गुणांवर केली पुष्पवृष्टी ।।१०।। स्वामी तुम्हावीण जीवन व्यर्थ आशीर्वादाने जिवंत होई मर्त्य ।।११।। तुमचे चमत्कार सारे अगम्य सांभाळीले भक्त ठेवून तारतम्य ।।१२।। स्वामी समर्थ खरे प्रभू कैलासावरील तुम्हीच शिवशंभू ।।१३।। साक्षात तुम्हीच हो दत्त छोटी घटना हो निमित्त ।।१४।। तुम्हीच हो ब्रम्हाविष्णुमहेश साऱ्या देवाचे हो ईश ।।१५।। साऱ्यात पवित्र सर्वेष तुम्हीच ताकदवान नरेश ।।१६।। भक्त कल्याणकारी सुरेश भक्त पसरले देश परदेश ।।१७।। पितांबर दिगबंर वेश दाही दिशांचा तूच सर्वेष ।।१८।। भिऊ नको पाठीशी मंत्र हम गया नही जिंदा है, गायत्री मंत्र ।।१९।। भितो कशाला हो पुढे स्वामीच आकाशा एवढे ।।२०।।

vilaskhanolkardo@gmail.com

Comments
Add Comment