पंतप्रधान मोदींच्या हस्ते बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राचा शिलान्यास

Share

लुंबिनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी नेपाळच्या लुंबिनी मठ येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीचा शिलान्यास केला.

नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी) यांना लुंबिनी येथे लुंबिनी विकास ट्रस्टने (एलडीटी) दिलेल्या भूखंडावर आयबीसीतर्फे हे केंद्र उभारले जाईल. आयबीसी आणि एलडीटी यांच्यात मार्च 2022 मध्ये भूखंडाबाबत करार झाला होता.तीन प्रमुख बौद्ध परंपरा म्हणजे थेरावद, महायान आणि वज्रयान यांच्या भिख्खूंच्या हस्ते शिलान्यास कार्यक्रम झाल्यानंतर, उभय पंतप्रधानांनी केंद्राच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.

एकदा हे केंद्र पूर्ण झाल्यावर, जगभरातून बौद्ध धर्माच्या अध्यात्मिक पैलूंचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांचे स्वागत करणारे जागतिक दर्जाचे केंद्र असेल. ही आधुनिक इमारत असणार आहे आणि उर्जा, पाण्याचा वापर आणि कचरा हाताळणीच्या बाबतीत नेट झिरो निकषांनी युक्त असेल. या इमारतीत प्रार्थना सभागृह, उपासना केंद्र, ग्रंथालय, प्रदर्शन हॉल, कॅफेटेरिया, कार्यालये आणि इतर सुविधा असतील.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

28 minutes ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

29 minutes ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

36 minutes ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

40 minutes ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

49 minutes ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

52 minutes ago