Friday, October 31, 2025
Happy Diwali

आला रे आला! मान्सून अंदमानात धडकला

मुंबई : अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. आज सकाळपासून मान्सूनने अंदमानात हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये ढग दाटून आले आहेत. तर केरळमध्ये १ जूनला मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

नैऋत्य मान्सूनचा पाऊस रविवारी दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून हवामान विभागाने केरळ, तामिळनाडू, माहे आणि लक्षद्वीप परिसराला देखील पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

सध्या अरबी समुद्रातून दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भारताच्या दिशेने जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. त्यामुळे केरळसह कर्नाटक किनारपट्टी, तामिळनाडू, माहे, लक्षद्वीप परिसरात अचानक मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment