Wednesday, July 9, 2025

अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे ‘प्रहार’मध्ये ‘हेल्थ कार्ड’चे शिबीर

अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे ‘प्रहार’मध्ये ‘हेल्थ कार्ड’चे शिबीर

मुंबई (प्रतिनिधी) : अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशनतर्फे बांद्रा पश्चिम येथील दैनिक प्रहारच्या कार्यालयात शनिवारी अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजेच "आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड" या शिबिर पार पडले. सुमारे १०० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.


फाऊंडेशनचे प्रमुख अश्विन यांच्या मते,"भविष्यात आरोग्यासंबंधी कोणतीही सेवा / सुविधा उपलब्ध करून घ्यायची असेल तर आभा कार्ड हे अनिवार्य असणार आहे. त्या आनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला "आभा" प्रकल्प हा एक स्तुत्य आणि संयुक्तिक प्रकल्प आहे." अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन हे सातत्याने मुंबईत विविध ठिकाणी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे.


या कार्याची समाजातील मान्यवरांनी दखल घेऊन त्यांना वेळोवेळी सन्मानित केले आहे. अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन हे आपल्या कुशल नेतृत्वाने आणि पुढाकाराने समाजातील तळागाळातील घटकांसाठी अनेक केंद्र सरकारच्या योजना यशस्वीपणे राबवत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >