Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘शेर शिवराज’चा विदेशातही डंका

‘शेर शिवराज’चा विदेशातही डंका

दीपक परब

लेखक-दिग्दर्शक-अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’रूपी चौथे सिनेपुष्प रसिकदरबारी सादर केले. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पाहायला मिळाले. केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही ‘शेर शिवराज’चा डंका वाजत असून लेखन-दिग्दर्शनापासून संवाद, अभिनय, सादरीकरण, गीत-संगीत, साहसदृश्ये या सर्वांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले आहेत. पहिल्या दोन आठवड्यांच्या जबरदस्त यशानंतर तिसऱ्या आठवड्यातही ‘शेर शिवराज’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’नंतर ‘शेर शिवराज’च्या रूपात ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. ‘शेर शिवराज’ चित्रपटाने यापूर्वीच्या तीनही चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडीत काढण्याच्या दिशेने जोरदार कूच केल्याचे चित्र राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहायला मिळत आहे.

पहिल्या दोन आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल्ल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, ‘शेर शिवराज’च्या टीमने घेतलेल्या मेहनतीवर रसिकांनी कौतुकाची थाप मारल्याचे सांगणारे दिसत आहे. टिकिटिंग पोर्टलवर या चित्रपटाला ९७% रेटिंग मिळालं आहे. परदेशांमध्ये सध्या १००हून अधिक चित्रपटगृहांमध्ये ‘शेर शिवराज’ पाहिला जात आहे. त्यात यूएसएमधील २०, जर्मनीतील १०, दुबईत १०, यूकेमध्ये ५, कॅनडात ५, ऑस्ट्रेलियातील ४ शहरांचा समावेश आहे.

हा आकडा आजवरच्या मराठी चित्रपटांच्या इतिहासातील खूप मोठा आहे. ‘शिवराज अष्टक’ मध्यावर पोहोचले असताना ‘शेर शिवराज’ने एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, पुढील चित्रपटात दिल्लीचे तख्त राखण्यासाठी त्या दिशेने कूच करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता चित्रपटाबाबतही प्रेक्षकांच्या मनात प्रचंड कुतूहल आहे. परदेशांमध्ये मराठी चित्रपटाला मिळत असलेले हे यश मराठी सिनेसृष्टीच्या भावी वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे प्रेक्षक मोठ्या जल्लोषात स्वागत करत आहेत. ‘शेर शिवराज’ प्रदर्शित झाल्यानंतर शोजची संख्या वाढवावी लागली.चित्रपटातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -