यूएईच्या अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान

यूएई : संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनानंतर यूएईचे अध्यक्ष कोण होणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागून होते. शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्यानंतर आता यूएईचे अध्यक्षपद प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे देण्यात आले आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे तिसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 17 वे शासक म्हणून काम पाहणार आहेत.


शेख खलिफांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. अशात आज यूएईचे नवे अध्यक्ष घोषित करण्यात आले.


गेल्या काही वर्षांपासून शेख खलिफा हे आजारी होते. त्यांचा सरकारी कार्यक्रमात किंवा इतर ठिकाणी वावर हा खूपच दुर्मिळ झाला होता. त्यांचे यासंबंधी फोटोही प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. 2004 साली शेख खलिफा यांचे वडील आणि यूएईचे संस्थापक शेख झाएद यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यूएईच्या अध्यक्षपदी शेख खलिफा यांची निवड झाली होती. काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला आणि ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले. शेख खलिफा हे यूएईचे दुसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे 16 वे शासक होते. ते शेख झाएद यांचे सर्वात मोठे अपत्य होते. जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये ४.७ तीव्रतेचा भूकंप; अनेक घरांचे नुकसान

इस्लामाबाद: सोमवारी पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार,

फिलीपिन्समध्ये फेंगशेन वादळ, १४,००० लोक बेघर; ७ जणांचा मृत्यू

मनिला : उत्तर आणि मध्य फिलिपिन्समध्ये आलेल्या उष्णकटिबंधीय वादळ ‘फेंगशेन’मुळे किमान ७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

भीषण अपघातात विमान धावपट्टीवरून थेट समुद्रात कोसळलं

मुंबई : अहमदाबाद विमान अपघातानंतर अलीकडे सतत विमान अपघातांची संख्या वाढलेली दिसते. हवाई प्रवास हा सुखकर,

पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र संग्रहालयात चोरी, घटनेनंतर संग्रहालय बंद

लंडन : पॅरिसमधील प्रसिद्ध लूव्र म्युझियममध्ये चोरीची घटना घडल्याने म्युझियम एक दिवसासाठी अचानक बंद करण्यात आले

अमेरिकेत ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात 'नो किंग्ज' आंदोलन, हजारो नागरिक रस्त्यावर!

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाशाहीविरोधात वॉशिंग्टन डीसीपासून ते

Bangladesh News : ढाका विमानतळात भीषण आग! विमानतळाचे कार्गो क्षेत्र आगीच्या विळख्यात; धुरामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. ढाका येथील हजरत शाहजलाल