Tuesday, May 6, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

पवारांना जीवे मारण्याची धमकी देणारा फार्मसीचा विद्यार्थी

पवारांना जीवे मारण्याची धमकी देणारा फार्मसीचा विद्यार्थी

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या तरुणाच्या मोबाईलमध्ये आणखी काही आक्षेपार्ह मजकूर आढळून आला आहे.


निखिल भामरे नावाचा एक तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करून आक्षेपार्ह ट्विट केले होते. या ट्विटमध्ये लिहिले होते, "वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग." या ट्विटवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती. यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


निखिल भामरे हा मूळचा सटाण्याचा आहे. तो सध्या दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे बी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. भामरे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी त्याने शरद पवारांविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी नाशिक ग्रामीण दिंडोरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तो बागलाणकर या नावाने आक्षेपार्ह ट्विट करत होता.


हा विद्यार्थी अशा प्रकारचे ट्विट केल्याने अडचणीत सापडल्याचे समजताच नेटकऱ्यांमधून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकारण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगावर केसेस घेऊ नयेत, असा सूर सोशल मीडियावरून उमटत आहे.

Comments
Add Comment