Monday, June 30, 2025

म्हाडा वसईत ७५ हजार ९८१ परवडणारी घरे बांधणार, ३१ मे रोजी सोडत!

म्हाडा वसईत ७५ हजार ९८१ परवडणारी घरे बांधणार, ३१ मे रोजी सोडत!

अत्यल्प उत्पन्न गटासाठी : ३०६ चौरस फुटांचे घर


अल्प उत्पन्न गटासाठी : ३२० चौरस फुटांचे घर


मुंबई : सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न साकार व्हावे म्हणून म्हाडा सातत्याने क्रियाशील असून, आता वसई येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३६० एकरवर सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. म्हाडाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर हा प्रकल्प मंजूर केला आहे आणि या प्रकल्पात ७५ हजार ९८१ घरे उभारली जातील.


म्हाडाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प मंजूर झालेला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रकल्प मंजूर करण्यासाठी म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॉन्सेपच्युअल ॲडव्हायजरी सर्व्हिसेस एलएलपी कंपनीच्या वसई येथील प्रकल्पाला मान्यता दिली आहे.


सुरक्षा स्मार्ट सिटीमार्फत सोडतीद्वारे याचे वितरण होईल. अत्यल्प उत्पन्न गटात ४५ हजार १७२ घरे असतील. त्यापैकी २७ हजार घरे म्हाडाच्या दरानुसार सोडतीसाठी असतील.


अल्प उत्पन्न गटात ३० हजार ८२९ घरे असणार आहेत. यापैकी १७ हजार घरे म्हाडा दराप्रमाणे उपलब्ध होतील. घरांची किंमत २२ लाख ५० हजार रुपये असेल.


अत्यल्प गटातील विजेत्यांना २.५ लाखांची सवलत मिळेल. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी पीएमएवायचे अनुदान मिळणार नाही. अत्यल्प उत्पन्न गटाला मुद्रांक शुल्काची रक्कम १ हजार आहे. अत्यल्प गटातील २ हजार ५०० घरांची सोडत ३१ मे रोजी काढली जाईल.

Comments
Add Comment