ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली आहे. केतकीला ठाणे क्राइम ब्रांचने अटक करुन कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शरद पवारांविरोधात दोन आक्षेपार्ह पोस्ट, केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल, तरुण ताब्यात
केतकी चितळे नेमकी आहे तरी कोण? तिची आतापर्यंतची वादग्रस्त प्रकरणे कोणती?
केतकीला नवी मुंबई येथून कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तिला एका रुममध्ये बसून ठेवण्यात आले होते. त्यानंतर ठाणे क्राइम ब्रांचच्या पोलिसांनी अटक करुन तिला कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी केतकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.