मुंबई : धारावीत घरात घुसून एका १९ वर्षीय विवाहित तरूणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी या किळसवाण्याचा कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही पीडितेने सांगितले.
दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच आरोपी याच परिसरातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धारावीत पहाटेच्या सुमारास दोन आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत संबंधित पीडितेवर त्यांनी सामूहिक बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, यावेळी आरोपींनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही पीडितेने पोलिसांना जबाबात सांगितले आहे. दरम्यान, ओळख लपवण्यासाठी आरोपींनी स्वतःचे चेहरे कापडाच्या सहाय्याने झाकले होते. त्यामुळे हे आरोपी नेमके कोण होते हे ओळखता आले नाही.
दरम्यान, राज्यातील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.