बाळासाहेबांचा मुलगा सीएम...पण आनंद दिघेंच्या… घरात नगरसेवकही नाही

मुंबई (प्रतिनिधी) : ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना आता उजाळा मिळत आहे. ‘धर्मवीर’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे.


हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी टाकलेली पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. ‘बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री, ‘शिष्य’ एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुखही नाही; पण निवडणूक आली की दिघे साहेब.


आज दिघे साहेबांवर आधारित ‘धर्मवीर’ नावाचा चित्रपट रिलीज झाला; पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही’, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे. आनंद दिघे यांचे कुटुंब राजकारणात सक्रिय नाही, असे निलेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे.


https://twitter.com/meNeeleshNRane/status/1525061245535068160

या चित्रपटाचा खास शो ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये शुक्रवारी पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउटसमोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेकही करण्यात आला.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला