मुंबई : टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे सगळे ठरवून आणि जाणूनबूजून वक्तव्य केले आहे. यावर कारवाई होणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
केतकी चितळे हीने फेसबूकवर केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेल्या या पोस्टमध्ये शरद पवारांवर, अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे.