मुंबई (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेच्या अनुदानात भरघोस वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. चे कार्यकारणी सदस्य व क्रीडाप्रेमी बाबुराव चांदेरे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी राष्ट्रवादी भवन-मुंबई येथे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.
यानिमित्त क्रीडाप्रेमी बाबुराव चांदेरे यांनी शासनाच्या वतीने थेट नियुक्त करण्यात येणाऱ्या खेळाडू कोठ्यातील फाइल प्रलंबित आहेत अशा ५४ खेळाडूंची यादी अजित पवार यांना सादर केली व त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. त्यात सायली केरीपाळे, गिरीश इरणाक, रिशांक देवाडीगा, अभिलाषा म्हात्रे, सोनाली शिंगटे या कबड्डीच्या खेळाडूंसोबत उत्कर्ष काळे, मनीषा दिवेकर, सोनाली तोडणकर, कोमल गोळे या कुस्तीच्या व खो-खोच्या ११ खेळाडूंचा सहभाग आहे.
चांदेरे यांच्या या विनंतीवरून अजित पवार यांनी संबंधीत खात्याच्या सचिवांशी संपर्क साधून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.