मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केले आहेत. “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली. यावर उद्धव ठाकरे यांनी काय कारवाई केली?” असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. तसेच हे वसुली सरकार असल्याचा आरोप केला. सोमय्या शुक्रवारी (१३ मे) उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार कुमार आयलानी यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते.
किरीट सोमय्या यांनी यावेळी ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला. “आदित्य ठाकरे यांची ७ कोटी रुपयांची चोरी पकडली गेली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी काय केले? रश्मी उद्धव ठाकरे यांचा १९ बंगल्यांचा घोटाळा बाहेर आला, त्यावर काय केले? उद्धव ठाकरे यांच्या मेव्हुण्याची साडेसहा कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली, काय केले? या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी द्यावीत.” असे ते म्हणाले.