शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन

  120

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार लटके हे सहपरिवार दुबईला होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लटके यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत.


लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक यांसह विविध पदे यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी १९९७ ते २०१२ असे सलग तीन वेळा नगरसवेक पद भूषवले.


त्यानंतर २०१४ मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आघाडीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या सुरेश शेट्टींना मतदारांनी १९९९ ते २००९ दरम्यान सलग तीन वेळा निवडून दिले होते. त्यामुळे सुरेश शेट्टींचा दबदबा होता. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा अशी ही तिहेरी लढत होती. भाजपाकडून सुनील यादव, तर काँग्रेसकडून सुरेश शेट्टी हे प्रतिस्पर्धी होते. मात्र जनतेने लटकेंना कौल दिला. लटकेंनी भाजपाच्या सुनील यादव यांचा ५ हजार ४७९ मतांनी पराभव केला. तर काँग्रेसची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. यानंतर २०१९ च्या लढतीत लटके यांनी अपक्ष मुरजी पटेल यांचा १६ हजार ९६५ इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

विद्यापीठात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, अवघ्या २९ दिवसांत दोन घटना

ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडातल्या शारदा विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आणि एका

मुंबईत कचरा उचलण्यासाठी आता ई-वाहन

वांद्रे ते सांताक्रूझमधील अरुंद गल्ल्यांमध्ये होणार वापर मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमधील अरुंद

संघाची दिल्लीत दोन दिवस बैठक

संलग्न संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार मुंबई : अमेरिकेने अलीकडेच भारतावर ५० टक्के कर लावण्याची घोषणा केली

आजही पाऊस बरसणार, कोकण,मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा अलर्ट

गेल्या दोन दिवसात पावसाने राज्यात सर्वदूर हजेरी लावली असून हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिला आहे.

एल्विश यादवच्या घरावर गोळीबार, २५ ते ३० गोळ्या झाडल्या

गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राममध्ये धक्कादायक घटना घडली. युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार झाला.

बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे