Friday, May 23, 2025

देशमहत्वाची बातमी

उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने आजपासून राज्यातील सर्व मदरशांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य केले आहे. आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


उत्तर प्रदेशाचे अल्पसंख्याक राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी हा आदेश दिला आहे. २४ मार्च रोजी उत्तर प्रदेशातील मदरशा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ९ मे रोजी याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होण्यापूर्वी गायल्या जाणाऱ्या धार्मिक प्रार्थनेबरोबरच राष्ट्रगीत (जन-गण-मन) देखील गायले जाणार आहे.

Comments
Add Comment