ताज महालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

अलाहाबाद : आग्र्यातील ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी केली. यावेळी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. आज तुम्ही ताज महालमधील खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली, उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्यासाठी परवानगी मागाल. याचिकाकर्त्याने विद्यापीठात जावे, एमए करावे आणि नेट उत्तीर्ण होऊन जेआरएफसाठी पात्र होऊन या विषयावर संशोधन करावे, तेव्हा तुम्हाला एखाद्या विद्यापीठाने रोखले तर न्यायालयात, या असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले.


ताजमहालात बंद असलेल्या २२ खोल्या उघडून त्याची पुरातत्व विभागामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. त्यावर न्यायाधीश डी. के. उपाध्याय आणि न्यायाधीश सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. याचिकेत मागणी करताना म्हटले होते की, देशातील जनतेला ताज महालाबद्दल सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितली होती, पण ती दिली गेली नाही. न्यायालयाने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत जनहित याचिकेचा गैरवापर करू नका, असे म्हणत त्याला चांगलेच सुनावले.


ताज महालात एखादी वस्तू लपवून ठेवली असेल तर त्याची माहिती लोकांना द्यायला हवी. ही जमीन कोणाची आहे हा मुद्दा नाही तर या खोलीत काय आहे हे जाणून घ्यायचे आहे, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडताना वकिलांनी म्हटले की, या प्रकरणी आग्र्यात खटला सुरु आहे. तसेच याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रात हा भाग येत नाही.

Comments
Add Comment

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित

भारत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करणार जलसाठा प्रकल्प

चीनच्या ७७ अब्ज डॉलर्सच्या हायड्रो प्रकल्पाला देणार प्रत्युत्तर नवी दिल्ली : ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सुरू

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा

हे भाजपा सरकार आहे, जे बोलतो ते करतो - अमित शाह

जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अकबर सर्वाधिक विवाह करणारा मुघल सम्राट, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

आजही, मुघलांची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणाने केली जाते. कधी त्यांच्या क्रूरतेसाठी, तर कधी त्यांच्या