मंत्रालयाजवळच तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील एका व्यक्तीने कुटुंबातील दोन महिलांसह मंत्रालय परिसरात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम विभागातील कर्मचारी त्रास देत असल्यामुळे आम्ही हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सदर व्यक्तीने सांगितले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तिघांचेही प्राण वाचले आहेत.


आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने हंबरडा फोडत आपली व्यथा मांडली. 'मी कर्ज घेऊन एका रस्त्याचे काम पूर्ण केले. या कामासाठी मला शासनाकडून १ कोटी ७० लाख रुपये मिळणे अपेक्षित असताना कसलीही रक्कम दिली जात नाही. याबाबत मी मंत्री अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती. मात्र बांधकाम विभागातील कर्मचारी दखल घेत नाहीत, त्यामुळे माझ्यासमोर आत्महत्या हाच पर्याय आहे,' असा आरोप सदर व्यक्तीने केला आहे.


मी भटक्या समाजातील असल्यानेच माझ्यावर अन्याय होत असल्याचा दावाही आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने केला.


दरम्यान, मंत्रालयाजवळच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता. पोलिसांकडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची समजूत काढण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा