शिष्यवृत्ती योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन

पुणे (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ४ हजार ३०५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत असल्याने महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तत्काळ निकाली काढण्याच्या सुचना समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.


सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल माहे डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत सन २०२१-२२ साठी ३९ हजार ८२६ अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अर्जाची छाननी करून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, पुणे यांच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे.


अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्याने अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी महाविद्यालयांची असेल व संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखर यांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Mahashivratri 2026: जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील विज्ञान

मुंबई: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची अपडेट; सुनेत्रा वहिनी मनात कोणताही...

मुंबई: राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र,

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या