Monday, December 2, 2024
Homeदेशभारतात सप्टेंबरमध्ये ५जी सेवा सुरु होणार

भारतात सप्टेंबरमध्ये ५जी सेवा सुरु होणार

नवी दिल्ली : इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी लवकरच भारतीयांना ५जी सुविधेचा लाभ घेता येणार आहे. देशात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यापर्यंत ५जी सेवा सुरु होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५जी लाँच झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५जी सेवा लवकरच सुरु होण्याची घोषणा केली होती. सीतारमण यांनी सांगितले होते की, २०२२ मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या ५जी मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाईल. स्वदेशी ५जी तंत्रज्ञान खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास मदत करेल. देशातील पहिला ५जी कॉल ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी जून ते जुलै दरम्यान स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दरम्यान, स्पेक्ट्रमचा लिलाव २० वर्षांसाठी असेल किंवा ३० वर्षांसाठी असेल याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

स्पेक्ट्रम म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी याचा वापर तुम्हाला मोबाइल डिव्हाइसवरून कॉल करणे आणि मॅप यासारख्या इतर सेवा सुरळीतपणे होण्यासाठी केला जातो. या मधूनच सिग्नल दिले आणि मिळवले जातात. आता ५जी साठी या स्पेक्ट्रमचा लिलाव होईल. त्यानंतर स्पेक्ट्रम विकत घेतलेल्या कंपनीकडून ग्राहकांना ५जी सेवा मिळेल.

दूरसंचार नियामक मंडळाने म्हणजेच ट्रायने ने स्पेक्ट्रमसाठी अनेक बँड्सवर मूळ किमतीवर ७.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत लिलाव करण्याची योजना आखली आहे. दूरसंचार मंत्रालय आणि ट्रायमध्ये स्पेक्ट्रमच्या लिलावासाठीच्या किमतीवर एकमत झालेले नाही. त्यांच्यामध्ये लिलावाबाबत सध्या विचार विनिमय सुरु आहे. स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी ट्रायने ने ७०० मेगाहर्टच्या किमतीत ४० टक्क्यांची कमी करण्याची विनंती केली आहे.

ग्रामीण आणि दुर्गम भागात परवडणारे ब्रॉडबँड आणि मोबाईल कम्युनिकेशन सक्षम करण्यासाठी पीएलआय योजनेचा एक भाग म्हणून ५जी इकोसिस्टमसाठी डिझाईन नेतृत्वाखालील उत्पादनाची योजना सुरू केली जाईल. परवडणारी ब्रॉडबँड आणि मोबाईल सेवा सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी, निधी अंतर्गत वार्षिक संकलनाच्या ५ टक्के वाटप केले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -