
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत माझे पैसे परत कधी करणार? असा प्रश्न भाजपा नेते मोहित कंबोज यांनी विचारला आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विटर हँडलवरून याबाबतचा स्क्रिनशॉट्सही शेअर केला आहे.
मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, संजय राऊत यांनी माझ्याकडून २०१४ मध्ये रॉयल मराठा इंटरटेन्मेंट नावावर २५ लाख रुपये घेतले होते. हे पैसे व्याजाने परत करू असे संजय राऊत यांनी सांगितले होते. आता माझे २५ लाख रुपये मला परत करा. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझे पैसे परत मिळवण्यासाठी मदत करावी, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना लगावला आहे.
https://twitter.com/mohitbharatiya_/status/1524262714230640642