Tuesday, July 23, 2024
Homeमहामुंबईराणा कुटुंबीयांच्या घरात अनधिकृत बांधकाम

राणा कुटुंबीयांच्या घरात अनधिकृत बांधकाम

पालिका पाठवणार नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : खार येथील राणा कुटुंबीयांच्या घरात अनधिकृत बांधकाम केले असल्याचे पालिकेच्या पाहणी पथकाला आढळले आहे. त्यामुळे पालिकेकडून राणा यांना रितसर नोटीस पाठवण्यात येणार आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे मुंबईतील खार येथील १४व्या रस्त्यावरील लाव्ही या इमरातीच्या ८ व्या मजल्यावर घर आहे. सलग दोन दिवस पालिकेचे पाहणी पथक राणा यांच्या घरी गेले होते. मात्र राणा दाम्पत्य घरी नसल्याने पाहणी न करता पथकाला परतावे लागले होते. सोमवारी पुन्हा हे पथक पाहणीसाठी गेले असता त्यांना घरात अनधिकृत बांधकाम झाले असल्याचे आढळले आहे. दरम्यान पालिकेच्या एच पश्चिम विभागाने नोटीस दिली आहे.

दरम्यान मंजूर आराखड्याव्यतिरिक्त घरात बदल केले असल्याचे पथकाला आढळून आले आहे. त्यामुळे राणा यांना लवकरच १५ दिवसांच्या मुदतीची नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. १५ दिवसांत त्यांना आपले म्हणणे मांडण्याची तसेच या बांधकामासंदर्भात परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -