Thursday, July 25, 2024
Homeमहामुंबईसमुद्रात मीठाबरोबर साखरही!

समुद्रात मीठाबरोबर साखरही!

सागरी गवतामध्ये १.३ दशलक्ष टन साखरेचा साठा जर्मनीतल्या एका संशोधनातून माहिती समोर

मुंबई : समुद्राच्या आतमध्ये साखरेचा एक मोठा स्त्रोतदेखील आहे. सागरी गवताच्या स्वरूपात असलेल्या या स्त्रोतामध्ये सुक्रोज असते. स्वयंपाकघरातल्या साखरेचा हा मुख्य घटक आहे. समुद्राच्या तळाशी असलेल्या सागरी गवतामध्ये १.३ दशलक्ष टन साखरेचा साठा आहे. तो ३२ अब्ज शीतपेयांच्या गोडव्याइतका आहे. जर्मनीतल्या ‘मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर मरिन मायक्रोबायोलॉजी’मध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनातून ही बाब समोर आली.

प्रकाश संष्लेषणादरम्यान साखर तयार होते. सीग्रास त्यांच्या चयापचयासाठी सुक्रोज वापरतात. सागरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ निकोल डुबिलियर म्हणतात की, समुद्री गवत प्रकाश संष्लेषणादरम्यान साखर तयार करते. संशोधकांनी त्यांच्या गृहितकांची पाण्याखालील सीग्रास कुरणात मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्राद्वारे चाचणी केली. तेव्हा असे आढळून आले की, सरासरी प्रकाशात हे सीग्रास त्यांच्या चयापचयासाठी सुक्रोज वापरतात, परंतु अधिक सूर्यप्रकाशात, जसे की दुपार किंवा उन्हाळ्यात या वनस्पती जास्त साखर तयार करतात. मग ते त्यांच्या रायझोस्फियरमध्ये अधिक सुक्रोज सोडतात. ही साखर आजूबाजूच्या वातावरणातले सूक्ष्म जीव शोषून घेत नाही. हे टाळण्यासाठी, सीग्रास इतर अनेक वनस्पतींप्रमाणेच फेनोलिक संयुगे पाठवते.

रेड वाईन, कॉफी आणि फळे तसेच निसर्गात इतर अनेक ठिकाणी आढळणारी ही रासायनिक संयुगे प्रतिजैविक आहेत आणि बहुतेक सूक्ष्म जीवांचे चयापचय रोखतात. त्यांचा वेग कमी करतात. सीग्रास ३५ पट वेगाने दुप्पट कार्बन शोषून घेतो. समुद्रातल्या गवताच्या कार्बन कॅप्चर नुकसानाची गणना करताना दिसून आले की, मानवी क्रियाकलापांमुळे आणि पाण्याची गुणवत्ता खालावल्यामुळे सुक्रोजचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे निळ्या कार्बन परिसंस्थेचे जतन करणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -