Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाकसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात; युवराज सिंहने मांडले मत

कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात; युवराज सिंहने मांडले मत

मुंबई (वार्ताहर) : कसोटी क्रिकेटचे भविष्य धोक्यात असल्याची चर्चा मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनेही टी-२० क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट धोक्यात असल्याचे म्हटले आहे.

युवराज सिंह म्हणाला की, सध्याचे क्रिकेटप्रेमी टी-२० क्रिकेटला अधिक पसंत करत आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील रोमांच कमी होत आहे. आजकाल अनेकांना टी-२० क्रिकेट खेळणे आणि पाहणे अधिक आवडते. त्यात टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये पैसाही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अधिक क्रिकेटर्स या क्रिकेट फॉर्मेटमध्ये अधिक रस घेत आहेत. कसोटी आणि टी-२० ची तुलना करताना का कोणता खेळाडू ५ लाखांसाठी ५ दिवस खेळणे पसंत करेल असेही युवराज म्हणाला.

युवराज सिंह पुढे म्हणाला की, सद्यस्थितीला सर्व दिग्गज खेळाडू जे भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीत, पण टी-२० क्रिकेट खेळून कोट्यवधी कमावत आहेत. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या अनेक देशांची स्वत:ची टी-२० लीग देखील आहे. युवराजच्या मते ज्या वेगाने टी-२० क्रिकेट वाढत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -