Tuesday, April 29, 2025

क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा

ऑस्ट्रेलियाचा सप्टेंबरमध्ये भारत दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणार आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहीतीनुसार, आरोन फिंचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झीम्बाम्बे आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध पांढऱ्या चेंडूवर मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. त्यानंतर वेस्ट इंडीज आणि इंग्लंडचे संघ ऑस्ट्रेलिया दौरा करतील. त्यांच्यात ३-३ सामन्यांची मालिका होणार आहे.

ऑस्ट्रेलियाने २०१८-१९ मध्ये भारत दौरा केला होता. त्यावेळी २ टी-२० सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती.

Comments
Add Comment