Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेहिंदुत्व सिद्ध करण्याची शिवसेनेवर वेळ: प्रवीण दरेकर

हिंदुत्व सिद्ध करण्याची शिवसेनेवर वेळ: प्रवीण दरेकर

भाईंदर : प्रखर हिंदुवादी भूमिका स्पष्टपणे जाहीररीत्या मांडल्यामुळे हिंदूंच्या हृदयावर अधिराज्य करणारे बाळासाहेब ठाकरे यांना तमाम हिंदूंनी उत्स्फूर्तपणे हिंदुहृदयसम्राट पदवी बहाल केली; परंतु आता महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केल्यामुळे जनता शिवसेनेच्या हिंदुत्वावर साशंक झाली आहे, म्हणून शिवसेनेवर आता हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाईंदर येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.

मीरा-भाईंदर भाजपचे प्रभारी झाल्यानंतर प्रथमच प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना शिवसेनेवर प्रखर टीका केली. प्रवीण दरेकर यांनी पक्ष बांधणी आणि संघटना संदर्भात मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -