Sunday, March 23, 2025
Homeदेशवाऱ्याने पूल उडाला...

वाऱ्याने पूल उडाला…

आयएएस अधिकाऱ्याच्या उत्तराने नितीन गडकरी अवाक

नवी दिल्ली : बिहारमध्ये बांधकामाधीन असलेल्या एका पुलाचा काही भाग २९ एप्रिल रोजी कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेचे कारण विचारले असता आयएएस अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तराने नितीन गडकरी अवाकच झाले. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगितला.

नितीन गडकरी म्हणाले, “२९ एप्रिलला बिहारमध्ये पूल कोसळला. मी माझ्या सचिवाला या दुर्घटनेचे कारण विचारले. तेव्हा त्याने मला सांगितले की जोराचा वारा सुटल्याने पूल कोसळला. मला एक समजत नाही, हवेने कसा काय पूल कोसळू शकतो? काहीतरी चूक झाली असणारच.”

१७१० कोटी खर्चून उभारला जात असलेला पूल जोराचा वारा सहन करू शकत नसेल तर हा चौकशीचा विषय असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. ३११६ मीटर लांबीच्या या पुलाचे काम २०१४ मध्ये सुरू झाले होते. २०१९ मध्ये ते पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही हे काम सुरूच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -