तबलावादक झाकीर हुसेन, उद्योजक गरवारे यांना मुंबई विद्यापीठाची मानद पदवी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध तबलावादक पदमभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ (एलएलडी) व प्रसिद्ध उद्योजक शशिकांत गरवारे यांना ‘डॉक्टर ऑफ लीटरेचर’ (डिलिट) ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे.


१२ मे २०२२ रोजी विशेष दीक्षान्त समारंभात राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित राहणार आहेत. हा विशेष दीक्षान्त समारंभ गुरुवार, दि. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या फोर्ट येथे सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.


मुंबई विद्यापीठाने यावर्षी जागतिक कीर्तीचे तबलावादक पदमभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना एलएलडी ही मानद पदवी तसेच गरवारे उद्योजक समूहाचे प्रमुख शशिकांत गरवारे यांना डिलिट ही पदवी त्यांच्या कार्यातील योगदानाबद्दल देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या प्राधिकरणाने घेतला आहे.


यापूर्वी विद्यापीठाने प्रसिद्ध कृषितज्ज्ञ स्वामिनाथन यांना डिलिट ही मानद पदवी देण्यात आली होती. या समारंभानंतर प्रसिद्ध गायक शंकर महादेवन व इतर विशेष कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

Comments
Add Comment

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत : विखे पाटील

मुंबई : उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,