अबूधाबी (वृत्तसंस्था) : जगभरात टी२० लीग क्रिकेट स्पर्धेच्या वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर यूएईच्या एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने यूएई टी२० लीग सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयपीएलच्या धर्तीवर खेळली जाणारी ही लीग पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू होऊ शकते. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी, अदानी यांच्या रिलायन्स ग्रुप आणि अदानी ग्रुपतर्फे संघ खरेदी केल्याच्या वृत्ताला एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने पुष्टी दिली आहे.
एमिरेट्स क्रिकेट बोर्डातर्फे सोमवारी जारी करण्यात आले की, अदानी स्पोर्ट्सलाइन कंपनीने यूएई फ्लॅग्शीप टी२० लीगमध्ये फ्रँचायजी घेतली असून हे या लीगसाठी विशेष असेल. लीगमधील सर्व ६ फ्रँचायजी नक्की झाले आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ही स्पर्धा होऊ शकते. अदानी-अंबानी यांच्या व्यतिरीक्त मँचेस्टर युनायटेड टीमशी जोडला असलेला ग्लेजर ग्रुप आणि दिल्ली कॅपिटल्सशी जोडला गेलेला जीएमआर ग्रुपनेही या लीगसाठी संघ खरेदी केले आहेत.