कॅनबेरा (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपल यांनी वेगवान गोलंदाज उमरान मलिक बाबत महत्त्वाचे विधान केले आहे. भारतीय संघाच्या व्यवस्थापनने वेगवान गोलंदाजांची फळी तयार केली आहे.
पण भविष्यात उमरान मलिकच्या वेगाकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल.चॅपलच्या वक्तव्यांना जागतिक क्रिकेटमध्ये गंभीरतेने घेतले जाते. क्रिकेटशी संबंधित एका साईडशी बोलताना चॅपल म्हणाले की, आयपीएलमुळे भारतात अनेक चांगले वेगवान गोलंदाज समोर आले आहेत. आयपीएल प्रेक्षक उमरान मलिकची स्तुती करत आहेत.
चॅपल मानतात की, जगात वेगवान गोलंदाजांना डोक्यावर घेतले जाते आणि भारतीय संघ या स्पर्धेत आगेकूच करत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान मोठे आहे. जर यापुढेही भारत असाच खेळत राहीला तर आगामी काळातही जागतिक क्रिकेटचे नेतृत्व भारतच करेल.