Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या चरणस्पर्श दर्शनाबाबत पुनर्विचार करावा

पंढरपुरात रुक्मिणी मातेच्या चरणस्पर्श दर्शनाबाबत पुनर्विचार करावा

सोलापूर (हिं. स) : श्री विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित आहे, तर श्री रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाली असल्याने चरणावर पुन्हा वज्रलेप करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चरणस्पर्श दर्शनामुळे मूर्तींच्या चरणांची अधिक झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने चरणस्पर्श दर्शनाबाबत पुनर्विचार करा, अशा सूचना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पुरातत्त्व विभागाचे संचालक श्रीकांत मिश्रा यांनी दिल्या.तसेच वज्रलेप करणे हाच यावरील एकमेव पर्याय असल्याचे निरीक्षण नोंदवत तसेच दोन्ही ठिकाणच्या गाभाऱ्यातील टाईल फरशी काढावी, मूर्तींवर अभिषेक मर्यादित ठेवावेत, फळाफुलांची आरास कमी करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचनाही मंदिर समितीला करण्यात आल्या.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास भेट देत रुक्मिणी मातेच्या चरणांची झालेली झीज याची पाहणी पुरातत्त्व विभागाचे संचालक मिश्रा व त्यांच्या चार जणांच्या टीमने पहाटे चार वाजता मूर्तींची पाहणी केली. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या विशेषत: रुक्मिणी मातेच्या चरणाची झीज झाल्याचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या श्रींच्या चरणस्पर्श दर्शनावेळी लक्षात आले. त्यानंतर मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाला याबाबत माहिती दिली.

त्यानुसार पहाटे चार पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोवळे परिधान करून श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी केली. या पाहणीत विठ्ठलाची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, तर रुक्मिणी मातेच्या चरणाच्या काही भागांची झीज झाल्याचे दिसून आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा