मुंबई (प्रतिनिधी) : चेन्नईने रविवारी दिल्लीचा दारूण पराभव केला. तब्बल ९१ धावांनी चेन्नईने हा सामना जिंकला. या सामन्यातील विजयासह संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार म्हणून धोनीने टी२० क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी विराट कोहलीनेही कर्णधार म्हणून ६००० धावा केल्या आहेत.
धोनीने या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. हा विक्रम नोंदवण्यासाठी धोनीला फक्त चार धावांची गरज होती. मात्र त्याने दिल्ली विरोधातील सामन्यात ८ चेंडूमध्ये चौकार आणि षटकार लगावत २१ धावा केल्या. याआधी हा विक्रम फक्त विराट कोहलीच्या नावावर होता. त्यानेदेखील टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधार असताना ६००० धावा केलेल्या आहेत.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनी आणखी एक विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये तो ५००० धावांच्या कल्बमध्ये जाण्यापासून फक्त ९१ धावांनी दूर आहे. आगामी काही सामन्यांमध्ये तो ९१ धावा करण्यात यशस्वी झाला, तर त्याच्या आयपीएल क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण होतील. तो विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, सुरेश रैना, एबी डिव्हिलियर्स या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल.