पाथरज गावाला मृत म्हशींमुळे दूषित पाणीपुरवठा

  139

नेरळ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील पाथरज गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या वरच्या भागातील तलावात एक म्हैस मृत झाली आहे. त्या म्हशीच्या शरीराचे अवयव कुजले असल्याने ग्रामस्थांना होणारा पाणीपुरवठा दूषित झाला आहे. दरम्यान, या दूषित पाण्याने ग्रामस्थांना साथीच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


कर्जत पाथरज ग्रामपंचायत मधील ८० ते ८५ घरांची लोकवस्ती असलेल्या पाथरज गावाला दोन ते तीन दिवस दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ग्रामस्थांनी गावात ज्या विहिरींमधून पाणी येते त्या विहिरींची जाऊन पाहणी केली असता त्या विहिरींच्या वरच्या भागात असलेल्या तळ्यात म्हैस मरून पडलेली दिसून आली. अनके दिवस ती म्हैस त्या विहिरीत पडलेली असल्याने मृत अवस्थेतील ती म्हैस सडून गेली होती. त्या तळ्यातील पाणी पाझरून विहिरीत येते व तेच पाणी पाथरज गावातील टाकीत साठवले जाते आणि ते सर्व पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. पाथरज गावासाठी आठ वर्षापूर्वी गाव तलाव - विहिर जिल्हा परिषद फंडातून बांधण्यात आली होती. त्याच विहिरीजवळ तळे आहे. त्या तलावात २० दिवसापूर्वी म्हैस मरून पडली होती.

दुर्गंधीयुक्त पाणी पिल्याने काही ग्रामस्थ अजारी सुद्धा पडले आहेत. ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे यासाठी ती विहिर काही ग्रामस्थांच्या मदतीने साफ करून त्यामधील पाणी बाहेर काढून फेकले आहे. मात्र तरीदेखील ग्रामस्थ यांच्या मनात दूषित पाणी पिल्याने साथीचे रोगांना निमंत्रण द्यावे लागू शकते अशी भीती निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

मुंबई गोवा महामार्गावरील माणगावसह इंदापूर बायपासचे काम तातडीने सुरू होणार

खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन माणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम

माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये

अखेर मुरुड आगारात पाच नवीन लालपरी दाखल

नांदगाव मुरुड : मुरुड या पर्यटन स्थळी एस टी आगारात जीर्ण झालेल्या बसेस मुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्ये तीव्र

एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या पारदर्शकतेसाठी मेरी पंचायत अ‍ॅप

एका क्लिकवर ग्रामस्थांच्या कारभाराची माहिती अलिबाग : केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर

कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा

संबंधित अधिकाऱ्यांसह तहसीलदारांकडून पाहणी पोलादपूर : जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या